वनविभागाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या जीवावर

तीन महिन्यांपासून कवठेसह परिसरात तरसाची दहशत

कवठे – कवठेसह परिसरातील सुरुर, वहागाव व अन्या गावठाण परिसरात गत तीन महिन्यांपासून तरसाचा वावर वाढला आहे. याप्रकरणी वारंवार वनविभागाकडे तक्रारीही करण्यात आले आहे. मात्र, वनविभागाने याकडे रितसर दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, सुरुर येथील पवारवस्तीवरील गुरांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईवर याच दोन तरसांनी हल्ला केला आहे. यामध्ये वासराचा मृत्यूदेखील झाला आहे. तरसांच्या दहशतीमुळे कवठेसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेले तीन महिन्यापासून दोन तरस कवठे, सुरूर, वहागाव व मोहोडेकरवाडी परिसरात फिरत आहेत. याबाबत दैनिक प्रभातने 2 ऑक्‍टोबरच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. यामध्ये वनविभागाने तरसांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली होती. मात्र याबाबत कोणतीही कारवाई वनविभागाच्या मार्फत केली गेली नाही. जोपर्यंत काही घडत नाही तोपर्यंत काहीही न करण्याच्या या भूमिकेने काल एका वासराला जीव गमवावा लागला.

वनविभाग वाईचे वनाधिकारी महिंद्रे यांना सदर बाब कळविली असता त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर भेट देवून वासराचा पंचनामा केला आणि नुकसान भरपाई मिळेल असे जाहीर केले. मात्र, यापुढे या तरसांकडून पाळीव प्राण्यांवर अथवा माणसांवर हल्ला होणार नाही याची शक्‍यताही नाकारता येत नसल्याने वनविभागाने तात्काळ या तरसांना पकडून नागरिकांना दहशतीच्या वातावरणातून बाहेर काढणे गरजेचे आहे. परंतु, वनविभाग नक्की काय भूमिका घेणार? की एखाद्या माणसाचा जीव जाण्याची वाट वनविभाग बघत आहे की काय? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)