वनवासी आश्रम, केरळ पूरग्रस्तांसाठी निधी

चिंचवड – केरळ राज्यात मोठा पूर आल्याने आर्थिक व जीवित हानी खूप मोठ्या प्रमाणात झाली. सामाजिक बांधिलकी व आपले भारतीय बांधव यांना मदतीचा हात देत आपला खारीचा वाटा उचलत क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या शाळा, क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर व क्रांतिवीर चापेकर विद्यालय, चिंचवड, तसेच खिंवसरा पाटील विद्यामंदिर व लोकमान्य टिळक विद्यालय, थेरगाव. या शाळांनी निधी संकलन करत तो पूरग्रस्त बांधवांसाठी सुपूर्त केला.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते निलेश क्षीरसागर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह विलास लांडगे, विद्याभारती संस्थेचे कार्यकर्ते रघुनाथ देविकर, वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते शुभांगी कानिटकर, ऋषभ मुथ्था, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ऍड. सतीश गोरडे, शाळा समिती अध्यक्ष नीता मोहिते, अशोक पारखी आदी उपस्थित होते.

-Ads-

उपस्थितांचे स्वागत विद्यार्थिनींनी सूर से सूर मिलाके गाये मंगल गान स्वागत गीताने केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते निलेश क्षीरसागर यांच्या हाती केरळ पूरग्रस्तांसाठी तसेच वनवासी कल्याण आश्रमासाठी शुभांगी कानिटकर व ऋषभ मुथ्था यांच्याकडे मदत निधी सुपूर्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)