वनप्लस 6T आला रे…

अॅपल आणि सॅमसंग या स्मार्टफोन क्षेत्रातील दोन आघाडीच्या कंपन्या. दोन्ही कंपन्यांचे स्मार्टफोन्स देखील अत्याधुनिक फिचर्स व प्रभावी डिझाईनद्वारे नटलेले. उत्कृष्ट कॅमेरा, मजबूत व टिकाऊ बॉडी, चांगली बॅटरी, नितळ डिस्प्ले या सगळ्या बरोबरच प्रत्येक वर्षी सादर करण्यात येणाऱ्या कंपनीच्या आघाडीच्या म्हणजेच फ्लॅगशिप स्मार्टफोन सोबत काहीतरी हटके फिचर देण्याचा अॅपल आणि सॅमसंगचा प्रयत्न असतो. असा नाविन्यतेने नटलेला काहीतरी नवीन फीचर असलेला स्मार्टफोन आपल्याकडे देखील असावा अशी आजकालच्या तरुणाईची अपेक्षा असते. पण तरुणाईच्या या अपेक्षेचा भंग करण्यासाठी एखाद्या व्हिलन प्रमाणे आडवी येते ती म्हणजे अॅपल आणि सॅमसंगच्या स्मार्टफोन्सची भरमसाठ किंमत! आपल्या खिशाला असे फोन परवडत नाहीत आणि जे फोन परवडतात त्यांच्यामध्ये पाहिजे ते फिचर्स मिळत नाहीत असा प्रॉब्लेम बहुतेकांना सतावतो. हाच प्रॉब्लेम सोडविण्यासाठी जन्म झाला स्मार्टफोन क्षेत्रातील एका नव्या ट्रेंडला तो म्हणजेच फ्लॅगशीप-किलर स्मार्टफोनला.

नावाप्रमाणेच फ्लॅगशीप-किलर म्हणजे असा स्मार्टफोन जो फिचर्स तर सगळे अॅपल आणि सॅमसंग सारख्या आघाडीच्या फ्लॅगशीप प्रमाणेच देतो मात्र किंमत त्यांच्यापेक्षा निम्मी! खिशाला परवडेबल अशा या फ्लॅगशीप-किलर स्मार्टफोन्सची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

बाजारपेठेत सध्या असे स्मार्टफोन्स बनवणारे अनेक ‘ब्रॅंड्‌स’ एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत मात्र या सर्वांमध्ये ‘वनप्लसने’ चांगलीच बाजी मारल्याचं चित्र आहे. वनप्लसद्वारे वनप्लस ‘6T’ हा स्मार्टफोन भारतामध्ये कालच सादर करण्यात आला असून वनप्लसच्या प्रिव्हियस मॉडेल्स प्रमाणेच हा स्मार्टफोन देखील हटकेच बनवण्यात आला आहे.

वॉटरड्रॉप डिस्प्ले डिझाईन: वनप्लस 6Tचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा डिस्प्ले. वनप्लस 6 मध्ये कंपनीने ग्राहकांना ‘नॉच’ डिस्प्ले दिला होता. आता याहून पुढे जात वनप्लसने 6T मध्ये ‘वॉटरड्रॉप’ डिस्प्ले दिला आहे याचा अर्थ असा की या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला केवळ एका पाण्याच्या थेंबाला लागेल एवढीच जागा सोडल्यास संपूर्ण डिस्प्ले असेल.

इन-डिस्प्ले-फिंगरप्रिंट स्कॅनर: वनप्लस 6Tचे आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे या स्मार्टफोनची स्क्रीनचं ‘फिंगरप्रिंट’ म्हणून काम करू शकणार आहे. या टेक्‍नॉलॉजीचा वापर करत वनप्लसने फिंगरप्रिंट साठी लागणारी जागा देखील वाचवली असून त्यामुळे जास्तीत जास्त डिस्प्ले देणे शक्‍य झाले आहे.

– प्रशांत शिंदे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)