“वनप्लस’च्या यशाची “सॅमसंग’ला धास्ती???

चायनीज स्मार्टफोन मेकर वनप्लस ने नुकताच भारतासह जगभरामध्ये वनप्लस 6 हा स्मार्टफोन सादर केला. वनप्लसचा स्मार्टफोन कंपनीचा बाजारपेठेतील आजवरचा प्रवास हा नक्कीच कौतुकास पात्र आहे. एक स्टार्ट-अप कंपनी ते प्रिमिअम स्मार्टफोन्स ला पर्याय देणारी कंपनी असा वनप्लस चा प्रवास थक्क करणारा आहे. वनप्लस वन पासून ते वनप्लस 6 पर्यंत कंपनी आपले फ्लॅगशिप किलर हे बिरुद साबूत ठेवण्यात नक्कीच यशस्वी झाली आहे. कमीतकमी पैश्‍यांमध्ये जास्तीत जास्त फीचर्स देण्याचा कंपनीचा फंडा हेच वनप्लसच्या यशाचे खरे कारण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकेकाळी मोबाईल म्हण्टलं कि नोकिया असं समीकरण भारतात पाहायला मिळायचा परंतु सॅमसंग ने बाजारात अँड्रॉइड आधारित स्मार्टफोन्स आणल्यापासून मोबाइल बाजारपेठेवर अधिराज्य गाजवणारा नोकिया हळू हळू मागे पडत गेला व सॅमसंग भारतातील सर्वात मोठी मोबाईल विक्रेती कंपनी झाली. प्रत्येकाच्या बजेट नुसार कमी-अधिक फीचर्स असणारे सॅमसंग चे फोन अँड्रॉइड बाजारपेठेत अक्षरशः अधिराज्य गाजवत होते परंतु चायनीज कंपन्यांनी भारतासह अन्य विकसनशील बाजार पेठांमध्ये घेतलेली उडी सॅमसंग ला नक्कीच चिंतेची बाब ठरली आहे व भविष्यात देखील ठरण्याचे चित्र आहे. एमआय सारख्या चायनीज कंपनीने देखील भारतीय बाजारपेठेत दमदार हजेरी लावली आहे खास करून मिड-रेंज फोन्स च्या सेगमेंट मध्ये एमआय चे वर्चस्व ठळकपणे दिसून येते. त्यातच वनप्लससारखी स्टार्ट-अप कंपनी सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोन्सला कडवे आव्हान देत आहे. नुकत्याच लॉन्च झालेल्या वनप्लस 6 ला आव्हान देण्यासाठी सॅमसंग ने केलेली जाहिरात, गॅलेक्‍सी 8 च्या कमी केलेल्या किमती व ए 8 प्लस या फोनचे लॉन्चिंग बरेच काहीं सांगून जाते. येणाऱ्या काळात सॅमसंगला वनप्लसकडून भारतातील प्रीमियम स्मार्टफोन बाजारपेठेत कडवे आव्हान मिळेल असं म्हणणे वावगं ठरणार नाही.

– प्रशांत शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)