वनक्षेत्रातील झाडांसाठी झाली पाण्याची व्यवस्था

प्रभात प्रभाव

रावणगांव- “दै. प्रभात’मधील (दि.18 नोव्हेंबर) च्या बातमीची दखल घेऊन खडकीमधील वनक्षत्रात जळून चाललेल्या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था वन विभागान केली आहे.
येथील शितोळे वस्तीलगत गट क्र. 709 व 710 मधील वनक्षेत्राच्या हद्दीती बांबू, लिंबू, सिसम, करंज, चिंच आणि बोर अशा प्रजातींच्या झाडांना पाणी न दिल्याने ती जळून चालली होती. “दैनिक प्रभात’ने ही गोष्ट लक्षात घेऊन याबाबत बातमीला प्रसिद्धी दिली आणि त्यामुळेच येथील झाडांना पाणी देण्याची व्यवस्था वन विभागाने केली आहे.
दरम्यान दौंड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे ही झाडे जळू लागली आहे. मात्र वनरक्षक शीतल मेरगळ आणि त्यांचे सहकर्मचारी बाळासाहेब आटोळे आणि झगड यांनी पाणी देऊन झाडांना जीवदान देत एक चांगले काम केले आहे. वनरक्षक शितल मेरगळ यांनी या भागातील झाडांना दिवसातून दोन वेळा पाणी देण्याची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत आहेत. या प्रकारे प्रत्येक वनरक्षक आणि कर्मचारी यांनी आपल्या परिसरातील झाडांची योग्य प्रकारे काळजी घेण्याचे काम केले तर परिसरात सर्वत्र हिरवागार निसर्ग निर्माण होईल. वनरक्षक शीतल मेरगळ यांनी आपल्या जबाबदारीत कुठलाही हलगर्जीपणा करत नसल्याने हे त्यानी झाडाना पाणी घालून इतर वन कर्मचारी यांच्यासाठी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे, या कला आहे.

  • पाण्याच्या कमतरतेमुळे पाण्याची व्यवस्था होत नव्हती, आता या झाडांना जगवण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.
    – शितल मरगळ, वनाधिकारी, खडकी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)