वनकुटा परिसरासाठी मोठा निधी देऊ

सुपा – वनकुटे ते भुलदरा या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार विजय औटी यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार औटी, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, बाजार समिती संचालक अशोक कटारिया, उद्योजक पोपट चौधरी, तसेच पारनेर तालुका युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहुल झावरे यावेळी उपस्थित होते.

आमदार विजय औटी म्हणाले की, वनकुटे व परिसराच्या विकासासाठी आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांचा विकास होणे गरजेचे असून, आज उद्‌घाटन करत असलेल्या वनकुटे ते भुलदरा रस्ता वनकुटा व परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या विकासासाठी वरदान ठरणार आहे. भविष्यात वनकुटा व परिसरातील वाड्यावस्त्यांसाठी कुठल्याच प्रकारे निधी कमी पडून देणार नाही. येथील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून या पठार भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ.
अनेक वर्षांपासून विकासापासून दूर असणाऱ्या वाड्या-वस्त्यांचा विकास करून हा संपूर्ण परिसर आणि या परिसरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचे काम करणार आहे. परिसरातील जनतेने विकासाच्या प्रवाहात सामील होऊन विकासकामे करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या पाठीमागे उभे रहावे, असे आवाहन आमदार औटी यांनी केले.

कार्यक्रमास गावातील गोपीनाथ गुंजाळ,बाळू इरोळे,विकास गागरे,संजय गागरे,यादव गागरे,बाबाजी गागरे,साहेबराव गागरे,रामदास मुसळे,बाबाजी मुसळे,कारभारी मुसळे, भिमाजी मुसळे,रामदास शेलार,दिलीप वालझाडे,बबन गागरे,विठ्ठल गागरे,बबन काळे,बाळू औटी,किसन साळवे,रामा साळवे,सुहास खामकर,कारभारी खामकर,छबु साळवे,टायगर शेख यांच्यासह परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)