वधूवरांनी देवदर्शनाला जाताना रस्त्यातच घेतले नेत्यांचे आशीर्वाद

निष्ठावंत कार्यकर्ता व नेत्यांमधील निस्सीम प्रेमाचा अनोखा संगम

काळगाव – सर्वसामान्यांच्या सुखदु:खात 24 तास बाराही महिने वाहून घेतलेले नेतृत्व म्हणून पाटणचे विधानसभेतील उत्कृष्ट संसदपट्टू आ. शंभूराज देसाई यांच्याकडे पाटण मतदारसंघातील जनता पहाते. त्यांचेवरील निस्सिम प्रेमापोटी आ. शंभूराज देसाई यांना पाटण मतदारसंघातील जनता आपल्या कुटुंबियातील प्रत्येक मंगल समारंभप्रसंगी आर्वजुन निमंत्रीत करते.पापर्डे येथील सातारा स्थायिक कार्यकर्त्यांच्या मुलाच्या अशाच एका लग्नसोहळ्यास आमदार शंभूराज देसाई यांना निमंत्रीत करण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र त्यादिवशी लग्नसोहळ्यांची मोठा मुर्हुत असल्याने मतदारसंघातील लग्नसोहळ्याच्या घाईगडबडीत त्यांना सातारा येथील या लग्नसोहळ्यास उपस्थित रहाता आले नाही. दुसरे दिवशी पापर्डे येथील ते नवदांपत्य देवदर्शनाला जात असताना त्या मार्गावर त्यांना आ. शंभूराज देसाई यांची गाडी दिसली. गाडीला हात करुन या नवदांपत्याने आ. शंभूराज देसाई यांना थांबवून त्या नवदांपत्याने त्यांचे रस्त्यातच आर्शिवाद घेतल्याचा प्रसंग पाटणमध्ये घडल्याने नेत्यावरील कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे असणारे प्रेम यातून दिसून आले. याची चर्चा सोशल मिडीयावर दिवसभर सुरु होती.

सामाजीक आणि राजकीय जीवनात काम करीत असताना पाटणचे आ. शंभूराज देसाई हे नेहमीच त्यांचे मतदारसंघात जनतेच्या प्रेमापोटी नवनवीन उपक्रम राबवित असतात. मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील मंगल समारंभांना त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या मुला-मुलीच्या विवाहाला, लग्नांच्या पुजेला आ. देसाई हे लावत असलेली हजेरी ही जिल्हाभर नेहमीच चर्चेचा विषय ठरलेली आहे. वर्षाकाठी ते 500 हून अधिक मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मुलांमुलींच्या लग्नसोहळ्यांना हजेरी लावतात.

यातून त्यांचेवर मतदारसंघातील जनतेचे असणारे प्रेम किती मोठे आहे हे दिसून येते. लग्नसोहळ्याची मोठा मुर्हुत असेल तर लग्नसोहळ्याच्या भेटीचा दौरा ते आदल्या दिवशी आखतात व त्याप्रमाणे ते लग्नसोहळ्यांना भेटी देतात. पापर्डे, ता. पाटण येथील स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे निष्ठावंत कार्यकर्ते विलास शिदु पाटील यांचे चि. विक्रम याचा शुभविवाह रविवार, दि.30 डिसेंबर रोजी सातारा येथे होता.

त्या लग्नसोहळ्यास आ. शंभूराज देसाई यांना हजर राहता आले नाही. 31 डिसेंबर रोजी आ. देसाई हे मतदारसंघातील लग्न सोहळ्यांना भेटी देत असताना पापर्डे येथील विलास पाटील यांचे कुटुंबियांतील नवदांपत्य हे देवदर्शना करीता पापर्डे येथे आले असताना त्या मार्गावर त्यांना आ. देसाई यांची गाडी दिसली. गाडीला हात करुन या नवदांपत्याने आ. देसाई यांना थांबवित त्यांचे रस्त्यातच आर्शिवाद घेतले. यावेळी काढण्यात आलेले छायाचित्र सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याने याची तालुक्‍यात एकच चर्चा झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)