वणव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळबागा खाक

मुंबई –  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा, कणकवली, वैभववाडी, मालवण आणि देवगड तालुक्‍यातील 15 गावांत वणवा पेटल्याने शेतकऱ्यांच्या फळबाग जळून खाक झाल्या. वणव्यामुळे नुकसान झालेल्या फळबागांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद नसल्यामुळे मदत मिळवून देण्याकरिता मुख्यंमत्र्यांना अवगत करून दिले जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी 2018 मध्ये वणवा लागून ऊस, काजू, आंबा या बागायती पिकांचे तसेच मांगरासह घरांचे झालेले नुकसानाबद्दल लक्षवेधी सुचना मांडली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)