वढू बुद्रुक येथे जलयुक्त शिवार योजनेतील कामे सुरू

तळेगाव ढमढेरे- महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मृद आणि जलसंधारणची कामे हाती घेण्यात आली आहेत. डोंगर उतारावर खोल सलग समतल चर, शेतामधील कंपार्ट बंडिंग, शेततळे ही कामे मंडल कृषी अधिकारी शिक्रापूर कार्यक्रमाच्या वतीने करण्यात आली आहेत.
या कामाचे उद्‌घाटन वढू गावचे उपसरपंच संजय शिवले यांच्या हस्ते करण्यात आले. या डोंगर उतारावरील खोल समतल सलग चर शेतांमधील बांधबंदिस्ती शेततळी या कामांमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे गावाच्या पूर्वेकडील भाग शेतीच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे. जलसंधारण कामांमुळे बागायत क्षेत्रात वाढ होऊन पिकांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे. यासर्व कामांमुळे पाण्याची टंचाई दूर होणार असून, या गावांत चालू असलेल्या कामास भेट देण्यासाठी आले असता तालुका कृषी अधिकारी संजय पिंगट, कृषी अधिकारी वसंतराव बांगर, कृषी पर्यवेक्षक संजय पाटील यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले. कृषी सहायक मेघराज वाळूंजकर यांनी विविध योजना राबविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते.
जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यासाठी गावातील गावपातळीवरील जलयुक्त शिवार समितीचे सदस्य राहुल भंडारे, ज्ञानेश्वर भंडारे यांनी ही योजना राबवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. यावेळी ज्ञानेश्वर भंडारे अशोक गोसावी राहुल भंडारे अभिषेक गोसावी ओंकार गोसावी नाना शेलार आदी शेतकरी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)