वढू बुद्रुकच्या उपसरपंचपदी रमेश शिवले बिनविरोध

शिक्रापूर-छत्रपती संभाजीमहाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र वढु बुद्रुक (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रमेश उर्फ रमाकांत विठ्ठल शिवले यांची बिनविरोध निवड झाली असून, संभाजीमहाराज समाधीस्थळाच्या विकासासाठी पुढाकार घेणार असल्याचे रमेश शिवले यांनी सांगितले.
संजय शिवले यांनी उपसरपंच पदाचा 3 एप्रिल रोजी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सरपंच रेखा साहेबराव शिवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या वेळेत रमेश उर्फ रमाकांत विठ्ठल शिवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यावेळी सरपंच रेखा शिवले यांनी उपसरपंचपदी रमेश शिवले यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, राजाभाऊ आहेर ज्ञानेश्वर भंडारे, माजी उपसरपंच संतोष शिवले, संजय शिवले, नवनाथ गुंडाळ, सुनीता भंडारे, निर्मला शिवले, निर्मला आरगडे, माजी सदस्य जालिंदर भंडारे, सोसायटीचे अध्यक्ष सदाशिव शिवले, संजय शिवले, सचिन शिवले, बबन शिवले, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे यांसह आदी उपस्थित होते. तर निवडीनंतर बोलताना रमेश उर्फ रमाकांत शिवले यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज यांच्या समधिस्थळाचा विकास करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून ब वर्ग मिळण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करताना प्रत्येक वाड्या वस्त्यांवर शुद्ध पाणी प्रकल्प, भूमिगत गटारे, रस्ते व स्टेट लाईट या सुविधा देण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)