वडेश्‍वर येथील आश्रम शाळेत पालक मेळावा

टाकवे बुद्रुक – आंदर मावळ मधील वडेश्‍वर येथील शासकीय आश्रम शाळेत ग्रामपंचायत शाळा समितीच्या वतीने पालक मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरदेचे सरपंच शांताराम बगाड होते. शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, गुलाब गभाले, बबन हेमाडे, शांताराम लष्करी आदी उपस्थितीत होते.

विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी, त्यासाठीची नियमावली पालकांनी सुचवली. मोबाईल वापरावर बंदी असावी. निवासी विद्यार्थ्यांना पालक आल्यावरच सुटी द्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. नवीन विस्तारित इमारत बांधण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी निधी मंजूर केला असून गरज पडल्यास ग्रामस्थ जमीन देतील, अशी माहिती शांताराम लष्करी यांनी दिली. मुख्याध्यापक बापू रौंधळ यांनी प्रास्ताविक केले. वणवे यांनी सूत्रसंचालन केले. राजू मळवदे यांनी आभार मानले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)