वडेश्‍वरच्या शिवकालीन विहिरीचे अस्तित्व धोक्‍यात

वडेश्‍वर : शिवकालीन विहिरीजवळच अतिक्रमण व खोदकाम केल्याने विहिरीचे अस्तित्व धोक्‍यात.

वडगाव-मावळ, (वार्ताहर) – वडेश्‍वर, आंदर-मावळ येथील शिवकालीन विहिरीच्या चोहोबाजूंनी अतिक्रमण तसेच खोदकाम झाल्याने वडेश्‍वरच्या शिवकालीन विहिरीचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. बेलापूर किल्ला, सिंहगड किल्ल्यावर 1600 ते 1800 शतकातील विहिरी आढळतात. ही विहीर ऐतिहासिक संरक्षित स्मारक म्हणून जपणे गरजेचे आहे.

मावळ तालुक्‍यात लोहगड, तिकोणा, विसापूर, तुंग, राजमाची किल्ले आहेत. ही विहीर चावीच्या आकाराची असून 30 बाय 50 आहे. विहिरीत जाण्यासाठी 25 पायऱ्या आहेत. चोहोबाजूंनी घडीव चिऱ्यांच्या दगडाचे बांधकाम आहे. विहिरीतील दोन शिलालेख कालखंड दाखवतात. विहिरीच्या परिसरातील अतिक्रमण व खोदकाम त्वरित रोखण्याची मागणी मावळ तहसीलदार रणजीत देसाई यांना मावळ ऍडव्हेन्चर्स आणि टीम अनुशासन गड-किल्ले सुरक्षा दल मावळ, शिवदुर्ग संवर्धन संस्था यांनी केली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)