वडूज येथे कलाकार मेळावा उत्साहात

वडूज येथे कलाकार मेळावा उत्साहात

‘लागीर झालं जी ‘मधील शितलीचे वडील “नाना “देवेंद्र देव यांची उपस्थिती
वडूज, दि. 29 (प्रतिनिधी)- वडूज येथे नुकताच कलाकार मेळावा पार पडला. निमित्त होते नवीन चित्रपट निर्मितीचे. अकलूज, जि. सोलापूर येथील सुप्रसिद्ध उद्योजक देशमुख बंधू यांच्या “देशमुख गोल्ड फिल्म प्रॉडक्‍शन’ या बॅनरखाली नवीन चित्रपट निर्मिती होत आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात असून एक बिग बजेट चित्रपट असल्याचे निर्माते देशमुख बंधुनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.
या चित्रपटात निवड झालेल्या काही कलाकार-तंत्रज्ञ यांचा चित्रपट, दिग्दर्शक डॉ. विनोद खाडे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक सदस्य ढोले गुरूजी, दिग्दर्शक धर्मेंद्र यादव यांचे हस्ते गोल्ड व सिल्व्हर कॉइन देवून सत्कार करण्यात आला.
देशमुख बंधू व आकाश माने मित्र परिवार यांच्यावतीने येथील हॉटेल आस्वादमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सध्या झी मराठी वर तुफान लोकप्रिय झालेल्या “लागिर झालं जी’ या मालिकेतील शितलीचे वडील “नाना’ देवेंद्र देव यांनी अचानक भेट दिली. त्यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले. यावेळी ढोले गुरूजी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी डी. ए. भोसले, पोपट सानप, महादेव साळुंखे, हरिष भोसले आदी कलाकार उपस्थित होते.

वडूज ः देवेंद्र देव यांचा सत्कार करताना देशमुख, विनोद खाडे, डी. ए. भोसले व इतर.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)