वडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी

वडूज : वडूज आगार व्यवस्थापनास निवेदन देताना गुरुप्रसाद गोसावी, रोहित देशमुख, संतोष पाटोळे, कृष्णदेव देशमुख व इतर.

सारथी सामाजिक संस्था व प्रवासी संघटनेची मागणी
वडूज, दि. 23 (प्रतिनिधी) – वडूज-मुंबई-वडूज (अंभेरी मार्गे) या मार्गाची बदललेली सेवा पुर्ववत सुरु करावी यासाठी सारथी सामाजिक विकास संस्थेकडून व प्रवासी संघटनेच्यावतीने वडूज आगाराला दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.
गेली वर्षानुवर्षे नियमित चालू असणारी व सामान्य माणसांना आपलीशी केलेली सध्या लाल परिवर्तन बसची सेवा रद्द करुन त्या जागेवर महागडी व न परवडणारी निम आराम (हिरकणी) सेवा प्रवाशांना विश्वासात न घेता लादली गेली. गेले 3-4 माहिने ही सेवा तोंड दाबून बुक्‍यांचा मार दिल्याप्रमाणे सहन करावी लागत आहे.
महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडलेले असताना अशा प्रकारचे सेवा बदलण्याचे निर्णय प्रशासनाकडून प्रवाशांवर लादले जात आहेत व यामुळे तिकीटामागे जास्तीचा 100 ते 150 रुपयांचा भूर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीचा विचार न करता असे अनेक अवास्तव निर्णय घेऊन एस.टी. खासगीकरणावर भर दिला जात असल्याचा संशय अनेक प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. तरीही महामंडळाच्या गलथान कारभारावर प्रवासी संघटना नाराज असून जुनी सेवा पूर्ववत न केल्यास आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा सारथी सामाजिक विकास संस्थेच्यावतीने देण्यात आलेला आहे. तरी याबाबतचे निवेदन वडूज आगार व्यवस्थापनाला दिले असून त्याची प्रत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना भेटून देण्यात येणार आहे. तसेच परिवहन विभाग, मंत्रालय व उपव्यवस्थापक यांनाही ही प्रत पाठविलेली आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)