वडूज ते बनपुरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे?

वडूज ः ऐन पावसाळ्यात डांबरी रस्त्याला पडलेल्या भेगा.

मुख्यमंत्री सडक योजनेचे काम हलक्‍या स्वरूपाचे
वडूज, दि. 29 (प्रतिनिधी)- येरळवाडी ग्रामस्थांच्या सोयीसाठी शिवसेना नेते रणजित देशमुख यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वडूज ते बनपुरी हा रोड मंजूर करण्यात आला. हे काम पूर्ण होत असताना वडूज ते करमारवाडी हे काम पहिल्या टप्प्यात चालू होते. उन्हाळ्याच्या दिवसात हा टप्पा झाला होता परंतु करमारवाडी ते येरळवाडी हा दुसरा टप्पा पावसाळ्याच्या दिवसात म्हणजे जून महिन्यात या टप्प्यास सुरुवात केली. पावसात केलेल्या कामामुळे काही ठिकाणी रस्ता खचला असून या कामास पूर्ण होऊन अजून दहा दिवस नाही झाले तोपर्यंत रस्त्याची ही अवस्था पुढे काय होणार असा नागरिकांचा प्रश्न? गेल्या पावसाळ्यात रस्त्यावर खडी टाकली आणि विद्यार्थ्यांना पावसात शाळेला पायपीट करत जावे लागते. खडीमुळे एसटी सेवा बंद झाली आहे. पावसात देखील आता डांबर टाकण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थ आश्‍चर्यचकित होत होते. रस्ता चांगल्या स्वरूपाचा झाला आहे आणि वेळ कमी लागत असल्याने या वडूज- बनपुरी रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे आणि रस्त्याचे खच्चीकरण यामुळे नागरिकांमध्ये वेगळी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर असलेल्या येरळा नदी पात्रामुळे या ठिकाणी सतत अवजड वाहनांची वाहतूक होत असते. यामुळे हा रस्ता किती दिवस टिकेल याबद्दल चर्चा सुरू आहे?

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)