वडूजला पत्रकारांचे धरणे आंदोलन

विविध संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा

वडूज – पत्रकार संरक्षण काद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करावी आदी मागण्यांसाठी आज वडूज शहर पत्रकार विकास संस्था व खटाव तालुका स्वाभीमानी पत्रकार संघाच्यावतीने येथील तहसिलदार कार्यालयसमोर सुमारे एक तास धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनास समाजातील विविध राजकीय पक्ष, सेवाभावी संघटनांनी पाठींबा दर्शवला. धरणे आंदोलनात पत्रकार धनंजय क्षीरसागर, आयाज मुल्ला, महेश गिजरे, समीर तांबोळी, धनंजय चिंचकर, नितीन राऊत, आकाश यादव, दत्ता कोळी, शरद कदम, योगेश जाधव, विनोद खाडे, संतोष सुतार, प्रा. नम्रता भोसले, प्रा. केशव जाधव, प्रतापराव माने, सतिश डोंगरे, स्वप्नील कांबळे, केशव कचरे, सुहास शिंदे आदी सहभागी झाले होते.

धरणे आंदोलनप्रसंगी पत्रकारांनी सुमारे एक तास जोरदार घोषणाबाजी केली. नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, उपनगराध्यक्ष विपूल गोडसे, बांधकाम सभापती वचन शहा, नगरसेवक शहाजी गोडसे, अभय देशमुख, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी उपसभापती नाना पुजारी, अनिल पवार, ऍड. प्रमोद देवकर, दत्तात्रय घार्गे, पारधी संघटनेच्या राज्याध्यक्षा राणी शिंदे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, नितीन शेडे, भारतीय किसान संघाचे विनायक ठिगळे, शिवाजी तुपे, ईश्‍वर जाधव, महादेव बुरूंगले, राहूल सजगणे, प्रा. सुनिल पाटील, हणमंतराव इंगळे दाजी आदींनी पाठींबा दर्शवला. नायब तहसीलदार कमलाकर भादुले यांनी निवेदन स्विकारले. पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के, गुप्तवार्ता विभागाचे शरद गुरव उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)