वडूजला धनगर समाजाचा मोर्चा

आरक्षणाबाबत सरकारच्या वेळकाढूपणाचा तीव्र निषेध

वडूज – धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गात आरक्षण तातडीने द्यावे, या मागणीसाठी खटाव तालुक्‍यातील धनगर समाज बांधवांनी ढोलच्या गजरात तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी फडणवीस सरकार वेळकाढूपणा करत असल्याबद्दल तीव्र निषेध करण्यात आला.

येथील हुतात्मा स्मारकापासून मोर्चाला सुरूवात झाली. अहिल्यादेवी चौक, बाजारपेठ, शेतकरी चौक, बाजार पटांगण, शहा पेट्रोल पंप, छत्रपती शिवाजी चौक, बस स्थानक मार्गे हा मोर्चा तहसिलदार कार्यालयावर गेला. त्यानंतर समाज बांधवांनी तहसिलदार कार्यालयाच्या प्रांगणात गजीनृत्याचा ठेका धरला. गजीनृत्याच्या दोन घाई झाल्यानंतर मान्यवर कार्यकर्त्यांनी मोर्चास संबोधीत केले. यावेळी बोलताना शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष टी. आर. गारळे, बाजार समितीचे संचालक विजय काळे, चंद्रकांत काळे, डॉ. महेश माने, आण्णा काकडे, रामदास शिंगाडे, नितीन बुरूंगले, आदींची भाषणे झाली. यावेळी बहुतांशी वक्‍त्यांनी आरक्षण देण्यास सरकार वेळकाढूपणा करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडले. प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवण्याबरोबर सातारा येथे दि. 24 रोजीचा आगामी मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

ऍड. नंदकुमार वाघमोडे यांनी आपल्या सहाय्यक सरकारी वकील पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
मोर्चात पंचायत समितीचे माजी सदस्य मोहनराव बुधे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आशाताई बरकडे, श्रीकांत काळे, ऍड. राहूल काळे, सुनिल सजगणे,हणमंतराव कोळेकर, राहूल सजगणे, अशोक काळे, प्रसाद काळे, महादेव बुरूंगले, राजाराम बरकडे, संजय काळे, शहाजी गोफणे, समीर गोरड, शशिकांत काळे, विक्रम काळे, भरत जानकर आदीसह युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)