वडूजमध्ये जनता क्रांती दलाचे धरणे आंदोलन सुरू

वडूज :जनता क्रांती दलाच्यावतीने वडूज येथे आजपासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरूवात करण्यात आली.

वाळू उपसा रोखण्यासाठी केलेली नियमबाह्य कमिटी बरखास्त करण्याची मागणी

वडूज, दि. 3 (प्रतिनिधी) – चितळी, ता. खटाव येथील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी करण्यात आलेली नियमबाह्य कमिटी बरखास्त करावी, येथील मागासवर्गीय समाजातील ग्रामपंचायतीच्या आजी माजी सदस्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, आदी मागण्यांसाठी जनता क्रांती दलाच्यावतीने वडूज तहसिलदार कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात दत्ता केंगारे, चांगदेव आवळे, सचिन पाटोळे, निवृत्ती फाळके, कुलदीप इंगळे, विकास सकट, गणेश इंगळे, स्वप्नील डावरे, हेमंत भिसे, राजेंद्र इंगळे, वैभव मदने, राजेंद्र डावरे, प्रतिक डावरे, संजय पुजारी, संभाजी भिसे, सुरज मदने, वैभव मदने, विशाल उमापे आदी सहभागी झाले आहेत.
याबाबत तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातील माहिती अशी, चितळी येथील बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी शासन नियमबाह्य ग्रामसभा घेवून 2 ऑक्‍टोबरला ठराव क्रमांक 7 ने स्थापन केलेली कमिटी तातडीने बरखास्त करावी व तसा आदेश द्यावा. गाव परिसरातील कारभार ओढा येथील बंधारा तसेच अन्य ठिकाणी बेकायदेशीर कमिटीने बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून विक्री केला आहे. त्या वाळूचा पंचनामा करून वाळू चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करावा, मागासवर्गीय समाजातील ग्रामपंचायतीचे सदस्य वैभव भिसे, माजी सदस्य राजेंद्र भिसे यांना बेकायदेशीर वाळू उपसा केल्याच्या खोट्या गुन्ह्यांत गोवण्यात आले आहे, त्याची चौकशी करावी, चांद नदीपात्रातील बेकादेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, सरपंच यांची कायदेशीर कमिटी करावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)