वडूजमध्ये चोरट्यांनी न्यायाधिशांचेच घर फोडले

वडूज – येथील जिल्हा न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या राहत्या बंद घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमेसह 48 हजारांचा चांदीच्या मूर्तींचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याबाबत शिपाई कैलास अण्णा जाधव यांनी वडूज पोलिसांत फिर्याद दिली आहे.

अधिक माहिती अशी, शुक्रवार, 30 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री जिल्हा न्यायाधीश मलाबादे राहत असलेल्या घराचे कुलूप तसेच कडी कोयंदा तुटला असल्याचे घरमालकाच्या नातेवाईकाला दिसून आला. याबाबतची माहिती त्यांनी फिर्यादी शिपाई कैलास अण्णा जाधव यांना दिली. यानंतर त्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली असता कडी कोंयडा तुटलेल्या अवस्थेत व दरवाजा अर्धवट उघडलेल्या अवस्थेत आढळून आला.

-Ads-

जाधव यांनी या घटनेची माहिती तात्काळ जिल्हा न्यायाधीश मलाबादे यांना फोनवरून दिली. त्यानंतर मलाबादे यांनी देवाऱ्यात चांदीचा गणपती व सरस्वतीची मूर्ती तसेच कपाटातील रोख दो-तीन हजार रुपये व चांदीचे ताट आहे का हे पाहण्यास सांगितले. जाधव यांनी घरात पाहणी केली असता या सर्व वस्तू चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध कैलास जाधव यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)