वडूजमध्ये गुंड बज्या पुजारीचा खून

अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची चर्चा

वडूज, दि. 18 (प्रतिनिधी) – वडूज, ता. खटाव येथील बाजार पटांगणालगत असलेल्या बागेत गुंड बजरंग उर्फ बज्या गदाप्पा पुजारी (अंदाजे वय 40) याचा दि. 17 रोजी रात्री 8च्या सुमारास धारधार शस्त्राने खून केल्याची घटना घडली. याबाबत वडूज पोलिसांत नाज्या राजेखान भोसले, गौरी नाज्या भोसले, दिंडी राजेखान भोसले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मीना घाडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 17 रोजी सायंकाळी 7.30च्या सुमारास दिंडी भोसले हिच्या झोपडीसमोर बजरंग पुजारी व नाज्या भोसले यांच्यात भांडणे सुरू झाली. बजरंग काठीने नाज्या भोसलेस मारत होता. यावेळी दिंडी व गौरी या शिवीगाळ करीत बजरंग यास मारहाण करत होत्या.

बजरंग नेहमीच त्रास देत असल्याचे दिंडी हिने तिच्या मुलास (नाज्यास) सांगितले. यावेळी नाज्याने तेथील असणाऱ्या खुर्चीने बजरंग यास मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन वेळा खुर्च्या मारल्यानंतर तुटलेल्या खुर्चीने व आणखी कशानेतरी मारल्यानंतर बजरंग हा खाली कोसळला व डोक्‍यातून रक्त वाहू लागले. तो निपचित पडल्याचे पाहून नाज्या व गौरी यांनी पळ काढला.

दरम्यान, यावेळी फिर्यादी यांनी बजरंग याच्याजवळ जाऊन पाहिले असता त्याच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. यावेळी फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यास माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येवून बजरंग यास येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्‍टरानी मयत घोषित केले. याबाबत मीना घाडगे यांनी वडूज पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)