वडूजमध्ये एकावर कुऱ्हाडीने वार

वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वडूज- येथील धान्य बाजार पेठेत रस्त्यावर एकावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवार, दि. 25 रोजी घडली. याबाबत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून जखमीवर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विशाल सर्जेराव काटकर (वय 32, रा. वडजल, ता. माण) हे कामानिमित्त वडूज येथे आले असता दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धान्य बाजार येथे मोटार सायकलीवर असताना अचानकपणे प्रशांत संजय पाटोळे (रा. शिरसवस्ती, खटाव ता. खटाव) हा मोटार सायकल उभी करून हातात कुऱ्हाड घेऊन येऊन हरामखोर सकाळची भांडणे सोडवायला तू होतास, तू मला दम देतो काय? तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणाला. त्यावेळी विशाल काटकर म्हणाले, सकाळची भांडणे मला माहित नाही, माझा काही संबंध नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, प्रशांत याने काही न ऐकून घेताच विशाल याच्यावर कुऱ्हाडीने डोक्‍यात, पोटावर, खुब्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे असणाऱ्या लोकांनी येऊन जखमीला वाचण्याच्या प्रयत्न करत असताना हातातील कुऱ्हाड टाकून आरोपी पळून गेला असल्याची फिर्याद विशाल काटकर यांनी वडूज पोलिसांना दिली असून याबाबतचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे. या घटनेचा तपास पो. नि. यशवंत शिर्के करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)