वडूजच्या नगराध्यक्षा शोभा माळी यांचा राजीनामा

वडूज, दि. 26 (वार्ताहर) -वडूजच्या नगराध्यक्षा शोभा माळी यांनी पदाचा राजीनामा दि. 26 रोजी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे दिला.
डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या वडूज नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पाच, काँग्रेस पाच, भाजपा तीन आणि अपक्ष चार जागेचा कौल वडूजकरांनी दिला होता. नगराध्यक्षाच्या निवडीवेळी नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी, भाजपा व अपक्ष यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या शोभा सचिनशेठ माळी यांची नगराध्यक्षापदी निवड केली होती. शोभा माळी यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांच्या अवधी असताना त्यांनी इतरांना संधी देण्यासाठी मुदतपूर्व राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राजीनाम्यानंतर वडूजमधील राजकीय हालचालींना वेग आला असून नगराध्यक्षा पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)