वडूजचे प्रेरणादायी नगरवाचनालय

प्रभात स्पेशल : ग्रंथालय चळवळ आणि वाचनसंस्कृती

तूच आहे तुजा जीवनाचा शिल्पकार’ हे ब्रीद वाक्‍य असलेले वडूजचे नगरवाचनालय नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. वडूज ता. खटाव येथे सन 1999 साली हुतात्मा परशुराम ज्युनियर कॉलेजमधील कॉमर्सचे प्राध्यापक एम. बी. पाटील व त्याचे विद्यार्थी डॉ. संतोष गोडसे, सोमनाथ बनसोडे, नंदकुमार गोरे, नितीन जगदाळे, सूर्यकांत निकम, श्रीकृष्ण बनसोडे, शशिकांत देशमुख या बेरोजगार युवकांना बरोबर घेऊन या युवकाकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना 100 रुपये वर्गणीतून ग्रंथालयाची सुरवात केली.सुरवातीच्या काळात 300 पुस्तके होती त्यावेळी वाचक सभासद 50 होते. हे युवक वेगवेगळ्या दिवशी या ग्रंथालयात बिना मोबदला काम करत होती. यात सभासद फी मधून पुस्तक वाढवत वाढवत नेली. आज या ग्रंथालयात पुस्तक संख्या 3000 इतकी असून वाचक सभासद 105 इतके असून या वाचनालयात वाचकांना वाचण्यासाठी 5 दैनिके वार्तपत्र असतात.

मायणीचे नेहरू वाचनालय

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मायणी येथील नेहरू वाचनालय हे खटाव तालुक्‍यातील एक आदर्श ग्रंथालय असून याची स्थापना 1967 मध्ये झाली. त्यावेळी स्व. अनंत मुरलीधर येळगावकर आणि सुधाकर दत्तात्रय कुबेर या दोघांनी वाचनालयाची निर्मिती केली. त्यावेळी शिक्षणाचा प्रसार कमी प्रमाणात होता. मायणी हे गाव दुर्गम भागातील गाव त्या गावातील लोकांना शिक्षण व माहितीचे आदान-प्रदान होण्याच्या दृष्टीने वाचनालय सुरू करण्यात आले. त्या काळात अवघ्या चार वाचकांवर सुरू झालेलं वाचनालय आज साधारणतः नियमित 259 वाचक व एकूम 2468 वाचक संख्या आहे सध्या वाचनालयात 15 दैनिके,14 साप्ताहिके व 33 मासिके येत आहेत. ग्रंथालयात एकूण 22, 164 ग्रंथसंख्या आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)