वडुजमध्ये खुलेआम व्हिडीओ गेम सुरू

अवैध धंदे बोकाळले तरी पोलिसांचे दुर्लक्ष : चौकशीची मागणी

सातारा – वडूज, ता. खटाव येथे अवैध धंदे बोकाळले तरी पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून शहरात विनापरवाना खुलेआम व्हिडीओ गेम सुरू असल्याची चर्चा सध्या आहे. परवानगीची वाट पाहता पोलिस ठाण्यापासून हाकेच्या हा व्हिडीओ गेम सुरू केला आहे. त्यास कुणाचा वरदहस्त आहे, त्याची चौकशी करण्याची गरज आहे.

वडूज शहरात सध्या खुलेआम अवैध धंदे चांगलेच बोकाळले आहेत. कुठे दारू अड्डे तर कुठे जुगार अड्डे सुरू असल्याची माहितीसमोर येत आहे. शहरातील बस स्थानकानजिक एकाने चक्क व्हिडीओ गेमच्या नावाखाली अवैध व्यवसाय सुरू केला आहे. त्यास परवानगी आहे का? कुणाचा वरदहस्ताने हा धंदा सुरू केला आहे, असे प्रश्‍न यामुळे उपस्थित होत आहेत. तालुक्‍यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वडूज शहरात जर असे खुलेआम व्यवसाय सुरू असतील तर पोलिस दुर्लक्ष का करत आहे? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

शहरात काही वर्षांपासून एक व्हिडिओ गेम सुरू करण्यात आला. त्यात चांगली कमाई होत असल्याचे समजताच आणखी एकाने हा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी शासकीय मान्यता घेणे आवश्‍यक असताना संबंधिताने मान्यता मिळण्याची वाट न बघता खाकीच्या सोबतीने एका घरात हा व्यवसाय सुरू केल्याची चर्चा आहे. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेला हा धंदा कुणाच्या मेहरबानीने सुरू आहे, याचा तपास होणे महत्त्वाचे आहे. या अवैध धंद्याचा तपास करून कायदेशीर मान्यता आहे का नाही याची पाहणी करणार का? याबाबत नागरिकांच्यातून तर्कवितर्क लढविले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)