वडुजच्या कराटे स्कूलचे राज्यस्तरावर यश

यशस्वी विद्यार्थ्यां समवेत कोच मिनाज मुल्ला व इतर

वडूज, दि. 3 (प्रतिनिधी) – येथील कराटे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय टाईग शु डो या स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळविले आहे.
यामध्ये वेदिका भेंडे, समृद्धी शिंगाडे, गीतांजली गाढवे यांनी सुवर्ण पदक पटकविले. तर अनिस मुल्ला, समिया मणेरी, आश्रफ मुल्ला यांनी रौप्य पदक पटकावले. या सर्व विजेत्या स्पर्धकांची नॅशनल स्पोर्टसाठी दिल्ली येथे निवड झाली. या विद्यार्थ्यांना शिक्षक मिनाज मुल्ला, अमीन मुल्ला, महेंद्र कुंभार आदींचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे अनिल देसाई, भाजप तालुका अध्यक्ष विकल्प शहा, नगराध्यक्ष शोभा माळी, नगरसेवक डॉ. महेश गुरव, अनिल माळी, राजेंद्र चव्हाण आदीनी अभिनंदन केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)