वडीवळे पूल पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला

कामशेत, (वार्ताहर) – कामशेत येथील वडीवळे पूल दोन-तीन दिवसांपासूनच्या पावसाने या वर्षी चौथ्यांदा पाण्याखाली गेला. पलिकडील गावांचा संपर्क तुटला आहे.

पुलावरून ये-जा करणारी अनेक गावे असून कामशेतला येणारांना सुट्टी घ्यावी लागली. कामशेत जवळील वडिवळे गावातील इंद्रायणी नदीवरील सांगिसे पूल जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असून दरवर्षी तीन ते चार वेळा पाण्याखाली जातो. वरच्या भागातून येणाऱ्या पाण्याबरोबर कचरा व अन्य वस्तू पुलाच्या पीलरला अडकल्याने पाण्यास अटकाव होऊन पुलाची मागील काही वर्षांपासून दूरवस्था होऊ लागली आहे.

मागील महिन्यातील धुवॉंधार पावसामुळेही पूल पाण्याखाली गेला होता. पुलाची उंची कमी असल्याने थोड्या पावसातही पाण्याखाली जातो. तसेच लोणावळ्यावरून इंद्रायणी नदीमार्गे येणारा पाण्याचा मोठा प्रवाहासमोर गेली अनेक वर्षे हा पूल तग धरून असला तरी मागील काही वर्षांमध्ये या पुलाची मोठी दूरवस्था झाली आहे. पुला पलीकडे वडीवळे, वळक, सांगिसे, बुधवडी, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, उंबरवाडी ही गावे आहेत. या गावांना जोडणारा हा एकच पूल दळणवळणास महत्वाचा आहे. नोकरदार वर्ग, विद्यार्थी, दूध व्यावसायिक, शेतकरी यांची गैरसोय झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)