वडिलांनीच मला करिअरसाठी प्रोत्साहित केले – सोनम कपूर

जेव्हा सोनम कपूर सिनेसृष्टीत नवीन होती तेव्हा तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, अभिनेत्रींचे करिअर हे लवकर संपते. यावर ठाम असताना, सोनमचे वडिल अनिल कपूर यांनी मात्र तीला इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे सोनमने सांगितले आहे. व्यक्ती म्हणून माझे वडिल हे खूपच सशक्त असून ते स्त्रीवादीही आहेत. मी मुलगी असल्याने माझ्यात काही तरी कमी आहे असे त्यांनी मला कधी वाटूच दिले नाही. मी 22 वर्षांची असताना सिनेसृष्टीत पाऊल ठेवले, त्यानंतर मला एकाजणाने तू तुझ्या करिअरमध्ये इतक्‍या धीम्या गतीने का वाटचाल करते आहेस? कारण, तुझ्या वयाच्या 30-31 वर्षापर्यंतच तू इथे काम करू शकतेस, असा प्रश्‍न केला होता. ही गोष्टी मी वडिलांना सांगितली. त्यावर ते म्हणाले की, तू मात्र असा विचार करू नकोस. कारण अभिनयावर तुझ प्रेम आहे, ते तुझ काम आहे आणि ते तुला आयुष्यभर करायचे आहे. सिनेसृष्टीत पाऊल टाकल्यानंतर एका गोष्टीचा धक्का बसल्याचेही सोनमने म्हटले आहे. इथले लोक खुपच लैंगिकतावादी आहेत. पुरुष आणि स्त्री अभिनेत्यांमध्ये येथे खूपच भेदभाव करतात. मात्र, माझ्या आई-वडिलांनी असा फरक आम्हा भावंडांमध्ये कधीच केला नाही. उलट त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर करिअर करण्यास आम्हाला प्रोत्साहन दिल्याचे सोनम सांगते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)