वडिलांच्या स्मरणार्थ बसस्थानकात वातानुकूलित विश्रामकक्ष सुरु : अजित शिंदे

कराड – माजी सैनिक म्हणून देशसेवा केल्यानंतर पुन्हा एसटी खात्यात नोकरी करीत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अविरतपणे लोकसेवा करणाऱ्या वडिलांच्या स्मृती चिरकाल स्मरणात रहाव्यात, यासाठी कराडच्या सुसज्ज अशा बसस्थानकात चालक, वाहकांसाठी वातानुकुलीत विश्रामकक्षाची सोय शिंदे कुटुंबियांकडून उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती कराड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे व डॉ. बजरंग शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरटीओ शिंदे म्हणाले, कै. बाळकृष्ण बाबुराव शिंदे यांनी समाजसेवा व लोकसेवेचा वसाच घेतलेला होता. देशसेवा बजावल्या नंतर त्यांनी एसटी खात्यात चालक म्हणून नोकरी स्विकारली. एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करीत त्यांचे प्रश्‍न सोडविताना त्यांना अनेकवेळा संघर्ष करावा लागला. प्रसंगी तुरुंगातही जावे लागले होते. कराड व आमच्या शिंदे कुटुंबियांचे घट्ट नाते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वडिलांच्या आठवणी कराडकरांच्या व आमच्याही कायम स्मरणात रहाव्यात, यासाठी नव्याने झालेल्या बसस्थानकात वडिलांच्या स्मरणार्थ चालक वाहकांसाठी सर्व सुविधांनीयुक्त असे वातानुकुलीत शयनगृह, सोलर वॉटर हिटर सिस्टीम, डायनिंग हॉल, विश्राम कक्ष शिंदे कुटुंबियांच्या वतीने उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 22 पैकी 17 वातानुकुलीत तर 5 विना वातानुकुलीत बेडची सोय करण्यात आली आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या सेवेतून आलेल्या अथवा इतर चालक वाहकांना शांत झोप घेता येईल. यामुळे त्यांचा व प्रवाशांचाही पुढील प्रवास सुकर होण्यास मदत होईल. याची निगा राखण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न महत्वाचे आहेत. असेही शिंदे यांनी यावेळी सांगीतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)