वडिलांकडून मुलासह त्याच्या मित्रांना मारहाण

वडिलांकडून मुलासह त्याच्या मित्रांना मारहाण
मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरत असल्याचा होता राग
…………………….
पुणे, दि.17 – लष्कर परिसरात मंगळवारी वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसोबत घराबाहेर रात्री उशिरापर्यंत फिरणाऱ्या मुलासह त्यांच्या मित्रांना एका पित्याने लाकडी दांडक्‍याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युसूफ मेमन (रा. गीता सोसायटी, सिनेगॉग स्ट्रिट) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाने फिर्याद दिल्यानंतर मेनन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलाच्या मित्राचा वाढदिवस असल्याने तो त्याच्या मित्रासह शुभेच्छा देण्यासाठी रात्री बाराच्या सुमारास गीता सोसायटीतील त्याच्या घरी गेला होता. शुभेच्छा दिल्यानंतर ते तिघे मित्र मौज-मजा करण्यासाठी कल्याणीनगर आणि विमाननगर परिसरात फिरून रात्री गीता सोसायटीजवळ परत आले. त्यावेळी युसूफ मेमन हे सोसायटीच्या गेटच्या बाहेर लाकडी दांडके घेऊनच उभे होते.
फिर्यादी आणि त्याचे मित्र गाडीतून खाली उतरताच युसूफ मेमन यांनी तुम्ही इतक्‍या रात्री उशिरापर्यंत घराबाहेर का फिरता? असे विचारत त्यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत फिर्यादीच्या नाकावर लागल्याने त्याचे नाकाचे हाड फ्रॅक्‍चर झाले आहे. मारहाणीनंतर फिर्यादीने घरी जाऊन वडिलांना हा प्रकार सांगितला. यानंतर मेनन यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)