हायकोर्टाचे आयआयटी-बॉम्बेला तातडीेने समिती तयार करण्याचे आदेश …

 मुंबई : उच्च न्यायालयाने आयआयटी बॉम्बेच्या संचालकांना वडाळ्यात भिंत कोसळलेल्या जागेचा आढावा घेण्यासाठी अभियंते व इतरांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याची सूचना केली. ‘आयआयटी’ संचालक मंडळ स्थापन करुन त्यांची टीम त्या साइटला भेट देईल आणि तात्काळ काय काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत सुचना करतील. असे कोर्टाने सांगितले आहे.

याबाबत बोलताना सोसायटीचे वकील अतुल दामले म्हणाले की, ‘बांधकाम क्षेत्रातील सध्याच्या इमारतींना नुकसान पोहचत  आहे, त्यात दोस्ती ब्लॉसमचाही समावेश आहे.

25 जूनच्या घटनेचा संदर्भ देऊन, दोस्ती रियल्टीच्या बांधकाम प्रकल्पाच्या बाजूला लॉयड बिल्डिंग कंपाउंडची भिंत कोसळली आणि त्यात अनेक गाड्या गाडल्या गेल्या होत्या. त्यामुळे दामले यांनी अशी मागणी केली की रिअल्टी फर्मला पुढील बांधकाम करण्यासाठी परवानगी देऊ नये.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)