वडार समाजातील विद्यार्थ्यांनी विकासासाठी पुढे येण्याची गरज!

डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत : गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पिंपरी – वडार समाजाने महापुरुषांचे प्रेरणादायी विचार घेऊन वाटचाल सुरु केली आहे. वडार समाजाचा खडतर प्रवास अगदी प्राचीन काळापासून चालू आहे. काळ बदलला. हजारो वर्षाची प्रगती झाली. खाणी संपल्या पण दगडावरचा घाव घालण्याची समाजावरची सक्ती अजूनही संपलेली नाही. विद्यार्थ्यांनी फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार घेऊन आव्हाने पेलावीत आणि समाजाच्या विकासासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर वडार समाज सेवा संघाच्या वतीने समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी पिंपरीतील कामगार भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे महापालिकेचे उपायुक्त तुषार दौंडकर, पोलीस उपनिरीक्षक राजू शिंदे, मनीषा विटेकर महाडीक, संघाचे अध्यक्ष प्रदीप पवार, संघटक दत्ता जाधव, कार्याध्यक्ष संतोष मोहिते आदी उपस्थित होते.

डॉ. श्रीपाल सबनीस यांनी विद्यार्थ्यांना वाईट प्रवृत्तीपासून दूर राहून अभ्यास करण्याचा सल्ला दिला. तसेच माणूस वाचणे आणि समाज वाचून यशाचा झेंडा फडकविण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी सचिव संजय जाधव, सहसचिव लखन पाटकर, उपाध्यक्ष पठाण बोटे, करण डुकळे, खजिनदार सुदाम कुऱ्हाडे, सहखजिनदार पन्नालाल वेताळ, आनंद नलावडे, अनिल विटकर, चंद्रकांत पवार, सुनील पवार, सुनील वेताळ, अरूण गोटे मारूती धोत्रे, शिवाजी विटकर, संजय पवार, लहू पवार, सुनील दांगडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप पवार यांनी केले. संजय जाधव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)