वडापुरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

रेडा – वडापुरी (ता. इंदापूर) येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील काटी चौकात व ग्रामपंचायत कार्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच महेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवजयंती महोत्सव समिती वडापुरी यांच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन फटाक्‍यांच्या आतषबाजीत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांमुळे गावातील वातावरण शिवमय झाले होते. यावेळी महेंद्र काळे, नारायण नलवडे, अमोल चंदनशिवे, कल्याण देवकर-पाटील, नितीन चंदनशिवे, तात्या भोसले, विलास सावंत-पाटील, विठ्ठल शिर्के, संतोष देवकर, ग्रामविकास अधिकारी एस. एम. भिलारे, महेश देवकर, नारायण पवार, सचिन पवार, चंद्रकांत तपासे, गणेश चंदनशिवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)