वडापुरी गाव दिवसभर 100 टक्के कडकडीत बंद

रेडा(प्रतिनिधी ) – येथे ता. 9 रोजी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत गावातील असलेली दुकाने व बाजारपेठा 100 टक्के बंद ठेवण्यात आल्या .

वडापुरी येथील ग्रामपंचायतच्या गाळ्यातील दुकानासह हॉटेल व्यावसायिकानी बंद ठेवण्यात आल्याने ; रस्त्यावर व गावात शुकशुकाट दिसत होते. आज गुरुवारचा आठवडे बाजार असून सुद्धा या ठिकाणी व्यापारी, भाजीपाला विकणारे शेतकरी सुद्धा न आल्याने दर गुरुवारी भरणारा बाजाराचे मैदान ओसाड दिसत आहे.

महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत आज अत्यावश्‍यक सेवा सोडून गाव पूर्णपणे 100 टक्के बंदला गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला व शांततेत पाळण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)