वडापुरीत अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

जंतनाशक गोळ्याचे वाटप

रेडा-वडापुरी (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रच्या वतीने श्रीनाथ विद्यालय, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी शाळेतील 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र बावडाच्या उपकेंद्र वडापुरी परिसरातील पंधारवाडी, अवसरी, बेडशिंग, येथे गोळ्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. वडापुरी परिसरात नऊशे साठ विद्यार्थ्यांना गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.कपिल कुमार वाघमारे यांनी माहिती दिली. यावेळी वाघमारे यांनी शाळाना भेट देवून माहिती घेतली. यावेळी आरोग्य सेवक संभाजी कसबे, आरोग्यसेवक महावीर कांबळे, आरोग्यसेविका कल्पना बुधावले, मोनाली घोळवे आशा वर्कर अनिशा सय्यद कविता चंदनशिवे ,सविता गोसावी ,राणी झगडे कल्पना भोसले, अर्चना माने, संगीता फलफले, सीमा तिकोटे, सुलोचना बनसोडे, रूपाली पांढरे यांचे सहकार्य लाभले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)