वडापाव विक्रेत्यांकडे हप्त्याची मागणी

पिंपरी – कोयत्याचा धाक दाखवून तिघांनी वडापाव विक्रेत्यांकडे हप्त्याची मागणी केली. हा प्रकार गुरुवारी ( दि. 8 ) रात्री साडेआठच्या सुमारास चिंचवड येथील बिजलीनगर परिसरात घडला. या प्रकारामुळे हातावर पोट असलेल्या छोट्या व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या प्रकरणी वडापाव विक्रेते दत्तात्रय एकनाथ पवार (वय-42, रा. बिजलीनगर, चिंचवड ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्ञान्या, योग्या, भट्ट्या ( पूर्ण नाव पत्ता माहिती नाही ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पवार हे चिंचवड येथील बिजलीनगर परिसरात वडापाव विक्रीसाठी हातगाडी लावतात.

-Ads-

गुरुवारी नेहमीप्रमाणे वडापाव विक्री करीत असताना त्या ठिकाणी आलेल्या आरोपींनी त्यांना “दर महिन्याच्या 10 तारखेला आम्हाला हप्ता मिळाला पाहिजे’ असा दम दिला. त्यावर फिर्यादी यांनी “कशाचा हप्ता’ असे विचारले असता आरोपींनी हातातील कोयते हातगाडीवर मारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच पवार यांना “बघून घेऊ’ अशी धमकी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)