वडाचे म्हसवे येथे पारंब्या खेळताना दुर्घटना

फलटण / कुडाळ – वडाचे म्हसवे, ता. जावली येथे सहलीला आलेल्या मुलाचा पारंबी डोक्‍यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. प्रज्वल नितीन गायकवाड (वय 11 रा. अलगुडेवाडी, ता. फलटण) असे त्याचे नाव आहे. फलटण येथील कमला निमकर बालभवन शाळेची सहल जावली तालुक्‍यात आली होती, त्यावेळी ही दुर्घटना घडली.

याबाबत माहिती अशी, फलटण येथील कमला निमकर बालभवन या शाळेची सहल वडाचे म्हसवे येथे आली होती. सहलीमधून इयत्ता पाचवीतील प्रज्वल हादेखील आला होता. या गावात वडाच्या पारंब्या खेळत असताना त्याच्या डोक्‍यात पारंबी पडली. यामुळे तो खाली पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेवेळी सहलीतील 31 विद्यार्थी व चार शिक्षक उपस्थित होते. प्रज्वलच्या मृतदेहावर मेढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह अलगुडेवाडी येथे आणण्यात आला. या घटनेमुळे अलगुडेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. प्रज्वलची मोठी बहीण याच शाळेत सातवीत आहे तर वडिल सुतारकाम करत असतात.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)