वडजूबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील ढोबळेवाडी-जारकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा परिसर आणि वडजूबाई मंदिर परिसरात स्वच्छता केली. जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढोबळेवाडी या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वडजुबाई मंदिर परिसर आणि जिल्हा परिषद शाळा परिसरात स्वच्छता करून स्वच्छता सर्वेक्षण अभियानात भाग घेतला. आपापल्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ करून परिसर स्वच्छतेसाठी स्वच्छता सर्वेक्षण 2018 राबवले जात आहे. या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडीतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. यावेळी शिक्षक विजय थोरात, वैजयंता थोरात यांनीही या अभियानात भाग घेतला. यावेळी पहिली ते चौथी इयत्तेतील तेहतीस विद्यार्थी सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)