वडगाव रासाईत पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

मांडवगण फराटा- शिरूर तालुक्‍यातील वडगाव रासाई येथील भीमा नदी पाञात पाण्यात बुडुन युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार (दि.2) रोजी घडली.
ऋतिक अरुण इंगळे (वय 18, रा.वडगाव रासाई) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत महेश राजेंद्र शेलार (रा. वडगाव रासाई) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, गुरुवारी (दि.2) दुपारी तीन वाजणेच्या सुमारास महेश शेलार आणि ऋतिक इंगळे हे दोघे वडगाव रासाई (ता.शिरुर) येथील भीमा नदी पाञात असलेल्या रासाई देवी मंदिराच्या गाभाऱ्यात साचत असलेले पाणी बाहेर काढण्यासाठी गेले होते. महेश शेलार हा गाभाऱ्याच्या भिंतीला ड्रिल मशिनच्या साहाय्याने छिद्र पाडत होता. तर ऋतिक हा होडी धरुन बाहेर थांबलेला होता. दरम्यान, ऋतिकच्या हातून होडी निसटल्याने त्याने गाभाऱ्यातील महेश यास हाक मारली. महेश याने ऋतिक यास पाण्यात उतरु न देता होडी (नाव) पकडण्यासाठी स्वत: नदी पाञात उडी मारली. त्यावेळी उभा असलेल्या ऋतिकने कपडे काढून खोल पाण्यात उडी मारली आणि होडीकडे पोहत येऊ लागला. माञ, पाणी खोल असल्याने आणि पाण्याला वेग असल्याने ऋतिक पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी महेशने होडीतून पाण्यात उडी टाकली. बुडत असलेल्या ऋतिककडे पोहत जाऊ लागला. मात्र, तत्पूर्वी ऋतिक पाण्यात बुडाला होता.
त्यानंतर महेशने मदतीसाठी जोरजोरात आरडा-ओरडा केला.यावेळी जवळच असणाऱ्या मच्छिमारांनी आणि गावातील पोहणाऱ्या मुलांनी नदीपाञात ऋतिकचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, घटनास्थळापासून सुमारे दोनशे फुट अंतरावर ऋतिक बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यास तत्काळ जवळच्या खासगी दवाखान्यात दाखल केले असता, डॉक्‍टरांनी तपासणीअंती मयत घोषित केले.
या घटनेची माहिती कळताच मांडवगण पोलीस चौकीचे पोलीस हवालदार श्रावण गुपचे, आबासाहेब जगदाळे, पोलीस मिञ अक्षय काळे यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनास न्हावरे येथील प्राथमिक रुग्णालयात पाठविला. या घटनेतील दुर्दैवी मृत्यू झालेला ऋतिक हा वडगाव रासाई येथील छञपती विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होता. त्याची घरची परिस्थिती बेताची असून त्याच्या झालेल्या मृत्यूमुळे वडगाव रासाई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)