वडगाव परिसरात विद्युत रोषणाईसह फुलांच्या सजावटीवर भर

  • गणेशोत्सव : सांस्कृतिक आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रमांना पसंती

वडगाव मावळ, (वार्ताहर) – येथील सुमारे 30 ते 35 लहान मोठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी गणेश मंडळे आहेत. या गणेश मंडळ असून, यंदाच्या वर्षी पौराणिक, विद्युत रोषणाई तसेच धार्मिक देखाव्यांवर भर देण्यात आली. बऱ्याच मंडळांनी विद्युत रोषणाईवर भर दिला आहे. तर काही मंडळांनी गणेश उत्सव मंडळे सध्या पद्धतीने साजरा करीत आहेत. वडगाव येथील सर्व सार्वजनिक मंडळे सातव्या दिवशी गणपती विसर्जन करीत आहेत.

वडगावच्या मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखला जाणारा श्री पोटोबा देवस्थानच्या गणपतीला यावर्षी आकर्षक अशी विद्युत सजावट करण्यात आली असून, यावर्षीचे अध्यक्ष पप्पू ढोरे आहेत. देवस्थानच्या वतीने यंदाच्या वर्षी नेत्र चिकित्सा शिबीर, आरोग्य शिबीर, मोफत धान्य वाटप असे सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे.

मानाचा दुसरा गणपती म्हणून ओळखला जाणाऱ्या बालविकास मित्र मंडळाने यंदाच्या वर्षी कोणताही देखावा सादर केला नाही. पर्यावरण संवर्धनासाठी थर्माकोल न वापरता साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत. मंडळाचे यंदाचे 44 वे वर्ष आहे. मंडळाच्या वतीने सलग चार दिवस नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून, वर्षभर डान्स मावळ डान्स, रांगोळी स्पर्धा, वसतिगृहात मोफत धान्य वाटप असे उपक्रम साजरे केले. शंकर साकोरे हे मंडळाचे अध्यक्ष असून. उपाध्यक्ष हे विक्रम मेडी आहेत.

जयहिंद मित्र मंडळ चव्हाण वाडा या मंडळाने यावर्षी माहूर गडाची देवी हा देखावा सादर केला असून, मंडळाचे यंदाचे 38 वे वर्ष आहे. या वर्षी भाऊसाहेब खामकर हे अध्यक्ष असून, राहुल गुरव उपाध्यक्ष आहेत. मंडळाने यावर्षी विविध सामाजिक उपक्रम करण्यावर भर दिला आहे.

आदर्श मित्र मंडळ ढोरे वाडा या मंडळाने या वर्षी “वैष्णव देवी दर्शन” हा देखावा सादर केला असून, मंडळाचे यंदाचे 38 वे वर्ष आहे. श्रीकांत चांदेकर हे यावर्षी मंडळाचे अध्यक्ष असून, कार्याध्यक्ष किरण ढोरे हे आहेत. उपाध्यक्ष केतन ढोरे हे आहेत.

अष्टविनायक मित्र मंडळ पाटील वाडा यंदाचे 39 वर्ष आहे. विशाल चव्हाण हे यावर्षी मंडळाचे अध्यक्ष असून, मंडळाचे संस्थापक सुनील चव्हाण हे आहेत. कानिफनाथ मित्र मंडळ कुडे वाडा मंडळाने नेत्रदीप विद्युत रोषणाई केली असून, मंडळाचे यावर्षी 39 वे वर्ष आहे. संदीप कुडे हे अध्यक्ष असून महेश कुडे व अमित कुडे हे उपाध्यक्ष आहेत. यावर्षी मंडळाने धान्य वाटप, वृक्ष रोपण आदी कार्यक्रम हाती घेतले आहेत.

जय जवान जय किसान शिवाजी चौक मंडळाने यावर्षी आकर्षक रोषणाई केली. साईबाबा यांची भव्य प्रतिकृती साकारली असून, मंडळाचे यावर्षीचे 43 वे वर्ष आहे. राकेश वहिले हे यावर्षीचे अध्यक्ष असून, अजित वाहिले कार्याअध्यक्ष आहेत. यावर्षी मंडळाने साई सेवाधाम येथील अनाथ आश्रमाला वायफट खर्च टाळून धान्य वाटप करण्याचा तसेच गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. जय मल्हार ग्रुप खंडोबा मंदिर मंडळाचे 9 वे वर्ष असून, संदीप ढोरे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत

नवचैतन्य तरुण मंडळ म्हाळस्कर वाडा या वर्षी आकर्षक रोषणाई सादर केली असून आहे. मंडळाचे 43 वे वर्ष असून, भास्करराव म्हाळस्कर हे संस्थापक असून शंकर चव्हाण अध्यक्ष तर युवराज म्हाळस्कर व प्रवीण म्हाळस्कर उपाध्यक्ष आहेत. योगेश्‍वर प्रतिष्ठाण टेल्को कॉलनी मंडळाने या वर्षी वेटलिप्टीग स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस व्यक्‍त केला असून, मंडळाचे या वर्षी 28 वे वर्ष आहे. अध्यक्ष प्रवीण पवार हे आहेत. तर उपाध्यक्ष बाळू परदेशी व सचिन मसटे हे आहेत. मंडळाने या वर्षी, वृक्षा रोपंन, वृक्ष वाटप महिलांसाठी व्याख्यान आयोजित केले आहे.

पंचशील मित्र मंडळ आंबेडकरनगर या मंडळाने यावर्षी माहीश मल्ली साम्राज्य महल व बाहुबली साम्राज्य महल प्रतिकृती देखावा सादर केला आहे. यावर्षी मंडळाचे 38 वे वर्ष असून, लहू मोरे अध्यक्ष तर मजर सयद हे उपाध्यक्ष आहेत.
साईनाथ मित्र मंडळ चांदणी चौक मंडळाचे या वर्षी 44 वे वर्ष असून, मंडळाने आकर्षक अशी गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापना केली आहे. रोहित निकम मंडळाचे अध्यक्ष असून, गणेश पटेल उपाध्यक्ष आहेत. यावर्षी मंडळाने “गोष्ट वडगावची’ हा देखावा सादर केला असून, या मध्ये वडगाव मधील क्रीडा क्षेत्रात व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा जीवनपट सादर केला आहे.

ओंकार मित्र मंडळ सुबक सजावट केली असून, मंडळाचे 33 वे वर्ष आहे. सोमनाथ धागडे हे अध्यक्ष आहेत.
गणेश तरुण मंडळ ढोरे वाडा या मंडळाचे 49 वे वर्ष असून, मंडळाचे संस्थापक गणेश अप्पा ढोरे हे आहेत. तर अध्यक्ष सुरेश ढोरे हे आहेत. या वर्षी मंडळाने “बालनशा व त्याचे दूषपरिणाम’ हा हलता देखावा सादर केला आहे .
श्रीराम मित्र मंडळ यांचे हे 38 वे वर्ष असून, अध्यक्ष सचिन पंडागळे हे आहेत. तर उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड हे आहेत यावर्षी मंडळाने कटपुतली बाहुल्यांचा खेळ हा देखावा सादर केला आहे.

रौप्य महोत्सवी वर्षात मोरया मित्र मंडळ ढोरे वाडा या मंडळाचे अध्यक्ष मयूर ढोरे असून, उपाध्यक्ष अतुल ढोरे हे आहेत. शिवज्योत मित्रमंडळ यांचे हे 5 वे वर्ष असून, प्रशांत शिदोरे हे मंडळाचे अध्यक्ष असून, संजय चव्हाण उपाध्यक्ष आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)