वडगाव नगरपंचायतीसाठी 13 एप्रिलला प्रभाग रचना, आरक्षण सोडत

  • तहसीलदार रणजित देसाई यांची माहिती : इच्छुकांची उत्सुकता शिगेला

वडगाव मावळ, (वार्ताहर) – वडगाव-कातवी ग्रुप ग्रामपंचायतीचे नागरपंचयातीत रूपांतर झाले असून, 13 एप्रिल रोजी प्रभाग रचना, आरक्षण सोडत कार्यक्रम होणार असल्याची माहिती तहसीलदार रणजित देसाई यांनी दिली. अनेक इच्छुक उमेदवारांची उत्सुकता ताणली आहे.

मंगळवार (दि.3 एप्रिल) रोजी प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरपंचायतीच्या प्रभागाची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती अरक्षणासह यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे, शुक्रवारी (दि. 6 एप्रिल) पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता घेणे. मंगळवारी (दि.10 एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी व नगरपंचायतीच्या वेबसाईटवर सह सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिद्ध करणे, शुक्रवारी (दि.13 एप्रिल) नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढणे. (अनुसूचित जाती, जमातीमधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यातील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला)

मंगळवार (दि. 17 एप्रिल) रोजी प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची अधिसूचना कलम 10 नुसार रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविणेकरिता वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करुन हरकती व सूचना मागविण्यात येतील.

शुक्रवार (दि.27 एप्रिल) पर्यंत प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देणे. गुरुवार (दि.3 मे) रोजी हरकती व सुचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन पुणे विभाग यांचेकडे अहवाल पाठविणे. मंगळवार (दि.8 मे ) पर्यंत विभागीय आयुक्तांची अंतिम प्रभाग रचनेस मान्यता घेणे. शुक्रवार (दि.11 मे) रोजी अंतिम प्रभाग रचना (प्रभागनिहाय एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व जमातींची लोकसंख्या तसेच अरक्षणासह वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावे.

नगरपंचायतीच्या प्रथम पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पद तसेच नगरसेवक पदाचे प्रभागनिहाय आरक्षण कोणते राहील हे शुक्रवारी (दि.13 एप्रिल) रोजी ठरणार असल्याने इच्छुक उमेदवारांची उत्सुकता ताणली आहे. अनेक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी गेल्या वर्ष सहा महिन्यांपासून केली असून, प्रत्येक उमेदवार पक्षाच्या उमेदवारीसाठी नेत्यांची मर्जी सांभाळत आहेत. तसेच उमेदवारांनी आपआपले कार्यकर्ते व समर्थकांची जुळवाजुळव केली असून, प्रचार सुरू केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)