देऊळगांवराजे- वडगांव दरेकर ग्रामपंचायतीचा वाळू बंदीचा ठराव झाला असून, सोमवारी (दि. 10) वडगांव दरेकर गावाची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक सरपंच मनीषा बाराते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गावातील पूर्ण वाळू बंदीचा ठराव करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वडगाव गावात उजनी जलाशय संपादित क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या क्षेत्रातून वाळू उपसा झाल्याने शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनी या वाळू उपसण्यामुळे पुराच्या पाण्याने वाहून जात आहेत. या पुढेही जाण्याची शक्‍यता आहे. गावाला तिन्ही बाजूंनी नदीचा वेढा आहे. 2017-18 या कालावधीत वाळू उपस्याची कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. जर दिली असेल तर महसूल विभागाने ती रद्द करण्यात यावी, तसेच कोणत्याही शेतकऱ्याने स्वतःच्या जमिनीतून रस्ता देऊन वाळू चोरी आणि वाहतुकीसाठी मदत केली तर त्या शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, असा सर्वानुमते ठराव यावेळी करण्यात आला. या ठरावासाठी सूचक सुखदेव वाघमोरे आणि अनुमोदक आप्पासाहेब कापसे आहेत. या ठरावाच्या प्रती महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री पुणे, खासदार बारामती,जिल्हाधिकारी पुणे, आमदार दौंड, उपविभागीय अधिकारी पुरंदर, तहसीदार दौंड, आरटीओ बारामती, कार्यकारी अभियंता उजनी जलाशय, पोलीस निरीक्षक दौंड यांना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)