वडगाव (ज.स्वा) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी युवकावर गुन्हा

पुसेसावळी, दि. 28 (प्रतिनिधी) -प्रेमाचे नाटक करून वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना वडगाव ज.स्वा ( ता.खटाव ) येथे घडली.
शुभम दत्तात्रय सकट (वय 20) असे तक्रारीत दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. औंध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडिता व तिच्या आईने याबाबत औंध पोलिसांत फिर्याद दिली आहे. शुभम सकट हा भावाचा मित्र असल्यामुळे त्याचे वरचेवर घरी येणे जाणे होते. त्यामुळे त्याच्याशी ओळख होती.एप्रिल महिन्यामध्ये घरी कोणी नसताना त्याने जबरदस्तीने अत्याचार केला व नंतरही वेळो वेळी अत्याचार करत राहिला. संबंधित प्रकार आईश कळल्यावर डॉक्‍टरांकडे तपासणी झाली. त्यात मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.या अत्याचार प्रकरणी युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला असुन अधिक तपास सपोनि एस.व्ही.लांडे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)