वडगाव गुप्ता रस्त्यावर अपघात ,एक ठार

नगर – नगर तालुक्‍यातील वडगाव गुप्ता रस्त्यावर टेम्पो व दुचाकीची धडक झाल्याची घटना घडली असून या घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेची अधिक माहिती अशी दि.25 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास सुभाष रामचंद्र कदम (रा.पिंपळगाव माळवी ,ता.जि.अ.नगर ) हे त्यांच्या एमएच 16 ए ए 2455 या क्रमांकाच्या दुचाकीवरून एमआयडीसी येथे कामाला जात असतांना पिंपळगाव माळवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर डेंटल कॉलेज जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा पिक टेम्पो एम एच 16 एई 1148 वरील अज्ञात चालकाने जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकी स्वारास गंभीर दुखापत झाल्यामुळे दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत कदम यांचा मुलगा मनोज सुभाष कदम याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून अज्ञात टेम्पो चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)