वडगाव गुंडची डिजिटल शाळा घालतेय भुरळ

पारनेर – तालुक्‍यात इंग्रजी शाळांमध्ये आपल्या पाल्याला शिक्षण घेण्यासाठी पालकांमध्ये चढाओढ सुरु आहे. मात्र, वडगाव गुंड गावातील मुलांना येथील डीजीटल शाळेने भुरळ घातली आहे.
बालवयातच मुलांना आधुनिक शिक्षणाचे धडे आनंददायी वातावरणात मिळत असलेल्या वडगाव गुंड येथील जिल्हा परीषद शाळा सध्या राज्यात रो मॉंडेल म्हणुन उदयास येऊ पहात आहे. महाराष्टासह, गुजरात, गोवा आदी राज्यातील शिक्षणतज्ञांनी या शाळेला भेट देवून येथील डीजीटल शाळा एक आदर्श मॉडेल म्हणुन स्विकारले आहे.त्यामुळे येथील डीजीटल शाळेचा महीमा राज्याबाहेर पसरला आहे. संपुर्ण राज्यात डिजीटल जिल्हा परीषद शाळेचे ब्रॅंड अँबेसीटर ठरलेले अन्‌ वडगाव गुंड येथील रहीवाशी असलेल्या संदिप गुंड या ध्येयवेड्या शिक्षकाच्या संकल्पनेतून राज्यातील विविध भागात डीजीटल शाळा सुरु झाल्या. संदिप गुंड यांची डीजीटल शाळेबद्दलची धडपड आणि राज्यातील विविध भागात त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने घेतली. सध्या ते राज्यभर व राज्याबाहेर डीजीटल शाळेसाठी कार्यशाळा भरवत आहेत. या उपक्रमाविषयी माहीती देताना संदिप गुंड यांनी मुलांची स्मार्ट हजेरी व कृतीयुक्त डीजीटल अध्यापनासाठी इन्स्टारेड तंत्रज्ञानाचा वापर या शाळेत करण्यात आल्याने मुलांची शिक्षणाची आवड वाढली आहे. तसेच डीजीटल शिक्षणाकडे मुलांचा ओढा वाढला आहे.
डीजीटल शिक्षणामुळे येथील मुलांना रंजक पध्दतीने शिक्षण मिळते . त्यामुळे मुलांमध्ये ताणतणाव रहात नाही. तसेच आनंददायी शिक्षण मिळत असल्याने दरवर्षी येथील शाळेत मुलांची संख्या वाढत आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचा ओढा या परीसरात असला तरी त्यासाठी स्पर्धा ही होते. मात्र डीजीटल शाळेमुळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतही मुलांची वाढती संख्या व आधुनिक तंत्रज्ञानाची कास यातून ही शाळा जिल्ह्यात नावारुपाला आली. यामागे येथिल शिक्षक, ग्रामस्थ व आधिकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याने आम्ही मुलांना आनंददायी शिक्षण देवू शकलो. हीच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
चौकटमुलांना सध्या मोबाईल गेम व स्किनवर पाहायला मोठ्या प्रमाणात आवडते. हे आम्ही हेरले आणि त्यातूनच या शाळेचा चेहरा बदलला त्यामुळे आता आमच्या शाळेत मुलांची शिक्षणासाठी संख्या वाढली .तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतही या डीजीटल क्रांतीमुळे बदल होतो हे आम्ही दाखवुन दिले असे संदिप गुंड यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)