वडगाव काशिंबेगमध्ये रंगला कुस्त्यांचा आखाडा

100 हून अधिक पैलवानांचा सहभाग ः राम जन्मोत्सवाची सांगता

मंचर – श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे आयोजित कुस्त्यांच्या जंगी आखाड्‌यात नामवंत पहिलवानांनी सहभाग घेतला. अनेक चितपट कुस्त्यांना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. यावेळी खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्‍यातील शंभर पैलवान सहभागी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे श्रीराम जन्मोत्सवाची सांगता कुस्त्यांचा जंगी आखाडा तसेच करमणुकीच्या कार्यक्रमाने झाली. कुस्त्यांसाठी गावालगत मैदान बनवण्यात आले होते. पारंपरिक वाद्याच्या साथीत वाजत गाजत पंच मैदानावर आल्यानंतर कुस्त्यांना सुरुवात झाली. सुरुवातीला लहान मुलांच्या कुस्त्या झाल्या. त्यानंतर मुख्य कुस्त्यांना प्रारंभ झाला.हलगीच्या तालावर पैलवानांना मैदानातून फिरवून प्रतिस्पर्धी निश्‍चित केला जात होता. खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्‍यातील पैलवान कुस्ती खेळण्यासाठी आले होते. यावेळी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पंच म्हणून लव्हाजी पिंगळे, संजय तारू, योगेश पिंगळे, काका कुलकर्णी यांनी काम पाहिले. शेवटची कुस्ती गावातील दोन तरुण पैलवनांमध्ये झाली. किशोर टेके आणि अक्षय पिंगळे यांच्यातील कुस्तीने समारोप झाला. विजेता पैलवानांची मिरवणूक काढण्यात आली.

दरम्यान कुस्ती मैदानालगत विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली होती. शेवरेवडी, ओली भेळ यांना विशेष मागणी होती. उद्‌घाटन तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या हस्ते झाले. मुंबई येथील पथकाने कार्यक्रम सादर केला. बाळासाहेब शिंदे यांनी यावेळी सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)