वडगाव काशिंबेगमध्ये एकी असल्यानेच गावाचा विकास

मंचर – वडगांव काशिंबेग ग्रामस्थांची एकी असल्यामुळे गावचा आर्थिक विकास झाला आहे. गावात असणारे अर्धपीठ गणपती देवस्थानास शासनाने “क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देऊन निधी उपलब्ध करून दिला आहे. यापुढील काळात “ब’ वर्ग मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे, तसेच गावाच्या विकासासाठी आपण भरीव मदत देऊ, अशी ग्वाही विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील तुलसी रामायण कथा कार्यक्रमात वळसे पाटील बोलत होते. यावेळी हभप रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी रामायण कथा सादर केली. याप्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विष्णू हिंगे, भास्कर डोके, श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शांताराम भैये, उपाध्यक्ष मारुती डोके उपस्थित होते. वळसे पाटील पुढे म्हणाले की, माजी खासदार स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने सर्वप्रथम वडगावात आलो होतो. तेव्हा गावात पाण्याची वानवा होती. मात्र, आज गाव सधन झाले असून, शेतकरीसुद्धा सधन झाला आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही तुलसी-रामायण कार्यक्रमाला भेट दिली. तीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या श्री राम मंदिराची पाहणी केली. त्यांच्यासमवेत सहसंपर्कप्रमुख अविनाश रहाणे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, योगेश बाणखेले, अशोक गव्हाणे उपस्थित होते. प्रास्ताविक कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे यांनी केले. बाळासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर बाळासाहेब पिंगळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)