वडगाव आनंद गावच्या हद्‌दीत बिबट्याचा मृतदेह

संग्रहित छायाचित्र...

आळेफाटा- चाळकवाडी आणि वडगाव आनंद ( ता.जुन्नर) गावांच्या सरहद्दीवर आनंदमळा येथील ओढ्याजवळ शुक्रवारी (दि.3) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
जुन्नर तालुका हा बिबट्याप्रणव क्षेत्र असलेला तालुका असून तालुक्‍यात बिबट्यांची संख्या अधिक आहे. शुक्रवारी (दि.3) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास येथील शेतकरी शांताराम पायमोडे हे काही कामानिमित्त आनंदमळा शिवारात असलेल्या ओढ्यावरील पुलाजवळून जात होते. त्यांना एका पडीक शेतात एक बिबट्या झोपलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांना दिली. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर ओतूर वनपरीक्षेत्र अधिकारी ओतूर आणि आळे विभागातील वनपाल सर्वश्री विशाल अढागळे, एस. पी. खट्टे, वनरक्षक जी. टी. विभूते, वनसेवक बी. के. खर्गे, गुंफेकर पारधी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून पहाणी केली. त्यानंतर माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अजय देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या बिबट्याचे उदापूर येथील रोपवाटिका केंद्रात शवविच्छेदन करुन बिबट्याचे दफन केले. हा नर जातीचा बिबट्या साधारणत: साडेतीन ते चार वर्षाचा असून या बिबट्याच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत. दोन बिबट्यांच्या भांडणात या बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वनखात्याने वर्तविली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)