वडगावात माऊलींच्या चांदीच्या पालखी रथाची मिरवणूक

वडगाव मावळ – श्रीक्षेत्र आळंदी देवस्थान ट्रस्टच्या संत ज्ञानेश्‍वर महाराज पंढरपूर पायी पालखी सोहळ्यासाठी वडगाव मावळचे रघुनाथराव उर्फ पंडितराव जाधव कुटुंबियांनी दिलेल्या चांदीच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. रघुनाथराव उर्फ पंडितराव जाधव, विलासराव जाधव, सुभाषराव जाधव, नंदकुमार जाधव कुटुंबियांनी स्वखर्चातून चांदीचा रथ तयार केला. या रथाची वडगाव मावळ शहरातून मावळ पंचायत समिती चौकापासून ते मुख्य बाजारपेठेतून जाधव कुटुंबियांच्या निवासस्थानापर्यंत विधिवत पूजा करून मिरवणूक काढून श्री क्षेत्र आळंदी देवस्थान ट्रस्टला रथ सुपूर्त करण्यात आला. यावेळी बाल वारकरी पथक, वारकरी संप्रदायातील महिला व नागरिक सहभागी झाले होते.

माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष नरहरी केदारी, नंदकुमार भसे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर आदींच्या हस्ते रथाची पूजा झाली.

मिरवणुकीत चंद्रशेखर भोसले, मंगेश काका ढोरे, नारायण ढोरे, तुकाराम ढोरे, अरुण चव्हाण, बंडोपंत भेगडे, सुनील ढोरे, संभाजी म्हाळसकर, विलास दंडेल, पंढरीनाथ ढोरे, राजेंद्र कुडे, अशोक ढमाले, महादू सातकर, अविनाश चव्हाण, दीपक पवार, राजेश बाफना, विशाल वहिले, मयूर द्‌शोरे, प्रवीण ढोरे, अनंता कुडे, मंगेश खैरे, सोमनाथ घोंगडे, बाळासाहेब दौंडे, सिद्धेश्‍वर झरेकर सहभागी होते.
रथामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचाही समावेश आहे. रथ दर्जेदार सागवान लाकडापासून बनवला आहे. मजबूत परंतु हलका असल्याने रथाला ओढताना बैलांना त्रास होणारा नाही. तसेच संरक्षणाच्या दृष्टीने रथाच्या चारही बाजूला व आतमध्ये एकूण सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत, अशी सुभाषराव जाधव यांनी माहिती दिली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)