वडगावात टॅंकर सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा

पळशी, दि. 10 (वार्ताहर) – वडगाव, ता. माण येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावासाठी त्वरित टॅकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली असून टॅंकर सुरू न झाल्यास सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिवडी यांना वडगाव ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडगावमध्ये भुगार्भातील पाण्याचे स्त्रोत संपले असून भीषण पाणी टंचाईला सोमोरे जावे लागत आहे. यामुळे पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे टॅंकरची मागणी केली आहे. परंतु, अद्यापही त्याची दखल घेतली नाही तरी वडगाव येथे टॅंकरच्या पाण्याच्या खेपा सुरू कराव्यात. अन्यथा, सोमवार, दि. 13 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दहिवडी-फलटण रस्त्यावर रस्तारोको आंदोलन करणार आहोत, असे निवेदनात नमुद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)