वडगावमध्ये आदिवासी दिन उत्साहात साजरा

वडगाव : ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर ते कार्यालयापर्यंत आदिवासींनी महापुरुषांच्या प्रतीमांसह भव्य मिरवणूक.

वडगाव मावळ, (वार्ताहर) – येथे भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघाच्या वतीने जागतीक आदिवासी दिन उत्साहात साजरा केला. यावेळी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर ते कार्यालयापर्यंत आदिवासी समाजाच्या महापुरुषांच्या प्रतीमांसह मिरवणूक काढली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेगावच्या माजी सरपंच भिकाबाई वाघमारे होत्या. काळाबाई वाघमारे, जिजाबाई वाल्हेकर, गंगाबाई जाधव यांच्या आदिवासी जनजागृतीच्या गीताने सभेची सुरुवात करण्यात आली.

भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघ पुणे अध्यक्ष म. ना. कांबळे म्हणाले की, आदिवासी समाज आजही विकासापासून वंचित असून त्यांना त्यांचे हक्‍क व अधिकार मिळणे आवश्‍यक आहे. शासकीय योजनांचा लाभ जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही. आदिवासी हा भारताचा मूळ समाज असून त्यांच्यातील अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव आदींमुळे विकासापासून आजही कोसोदूर आहे, असे मावळ तालुकाध्यक्ष माऊली उर्फ ज्ञानदेव सोनवणे म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ विश्‍लेषक प्रवीण भालेसैन, एल. आर. कांबळे, जयराम साळवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आदिवासी समाजातील महादेव कोळी, ठाकर, कातकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक बाळकृष्ण टपाले यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)